मुलांनो मोबाईल वरील खेळ खेळू नका.
मैदानी खेळ जीवनात आवश्यक आहेत.
महेंद्र देशमुख
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
![]()
मुलांनो मोबाईल वरील खेळ खेळू नका.
मैदानी खेळ जीवनात आवश्यक आहेत.
– महेंद्र देशमुख
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
सम्राट अशोक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सवाला सुरुवात.


ठाणे,कल्याण. ( मनिलाल शिंपी)– खेळ हा जीवनातील महत्त्वपूर्ण घटक आहे शिक्षणाबरोबर खेळ खेळत रहा. खेळातून प्राविण्य मिळवलं तर नोकरी कामी उपयोगी येते. मोबाईल वरील खेळ खेळू नका. मैदानी खेळ खेळलात तर जीवनात अमुलाग्र बदल होतात. असे मत कल्याण पूर्व कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांनी व्यक्त केले .सम्राट अशोक विद्यालयाच्या चार दिवशीय वार्षिक क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली .संस्थेचे अध्यक्ष पी. टी .धनविजय, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख,तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र महासचिव संदीप ओंबासे, शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ डेकले, यांच्या उपस्थितीत क्रीडा ध्वजाचे ध्वजारोहण करून मशाल प्रज्वलित करून औपचारिक उद्घाटन करण्यात आले .संदीप ओंबासे म्हणाले खेळातून आपले आरोग्य सुदृढ राहते खेळातून देश सेवा करण्याची संधी मिळते . मान्यवरांसह ए. एस. आय. चव्हाण, पोलीस कर्मचारी चकोर उपस्थित होते .माध्यमिक मुख्याध्यापक गुलाबराव पाटील प्राथमिक मुख्याध्यापिका सुजाता नलावडे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार केला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी केला तर सूत्रसंचालन गणेश पाटील यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार संतोष कदम यांनी मानले.

