1 min read

अमळनेर तालुक्यातील
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कर्मचारी सज्ज..

Loading

अमळनेर तालुक्यातील
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कर्मचारी सज्ज..उद्या होणार मतदान..

उद्या होणार मतदान..

मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी- तहसीलदार मिलिंदकुमार वाघ

अमळनेर प्रतिनिधी( ईश्वर महाजन)
अमळनेर तालुक्यातील 24 ग्रामपंचायत निवडणुकीबाबत 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे त्यासाठी आज दिनांक 17 डिसेंबर सकाळी इंदिरा भवन अमळनेर येथे कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप करून आपापल्या गावावर रवाना करण्यात आले.
24 ग्रामपंचायत पैकी चार ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात आल्या. 22 ग्रामपंचायतीचा निवडणुकीचे मतदान उद्या 18 डिसेंबर रोजी होत आहे . त्यासाठी एकूण बुथ 63 आहेत.
त्यासाठी अमळनेर तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, निवासी नायब तहसीलदार अमोल पाटील, नवनाथ लांडगे व सर्व महसूल कर्मचारी उपस्थित होते. यासाठी पोलीस कर्मचारी काही गावांमध्ये तैनात करण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये यासाठी अमळनेर तालुक्याचे पोलीस निरीक्षक शिंदे व पोलीस कर्मचारी यांनी तगडा बंदोबस्त ठेवलेला आहे.
यावेळी मसूलचे कर्मचारी अमोल भदाणे, एस.व्हि भावसार,तलाठी स्वप्निल कुलकर्णी ,वाल्मीक पाटील, धीरज देशमुख, प्रथमेश पिंगळे,आशिष पारधे,विकास परदेशी, पिंटू चव्हाण, संगिता भोसले,निता पजई,ज्योती गुसिंगे नितीन ढोकणे,मुकेश काटे,जगदीश पाटील सह महसूल कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *