1 min read

वसंत पाटील यांना स्वर्गीय गजानन पाटील जीवनगौरव पुरस्कार २०२२ मान्यवरांच्या हस्ते प्रदान!

Loading

वसंत पाटील यांना स्वर्गीय गजानन पाटील जीवनगौरव पुरस्कार २०२२ मान्यवरांच्या हस्ते प्रदान!

ठाणे,कल्याण( मनिलाल शिंपी) ::
आगरी समाजाचे ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते व निऴजे गाव येथील संकल्प बहुउद्देशिय सामाजिक संस्थेचे संस्थापक वसंत रामचंद्र पाटील यांना शैक्षणिक, सामाजिक, क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल स्व.गजानन पांडुरंग पाटील जीवन गौरव पुरस्काराने गुरूवार दि. १५/१२/२०२२ रोजी सन्मानित करण्यात आले. हा संपूर्ण सोहळा कोन येथील गजाननराव पांडुरंग पाटील महाविद्यालयात मोठ्या थाटामाटात श्री सुरेश दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. 
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नेते श्री अनंत शिसवे, भिवंडी पंचायत समितीचे सभापती श्री.भानुदास काशिनाथ पाटील, भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.विलास पाटील,
स्वराज्य तोरण चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष तथा दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.किशोर बळीराम पाटील, भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ. यशवंत अनंत म्हात्रे, कोन गावच्या प्रथम नागरिक डॉक्टर रूपाली अमोल कराळे, ठाणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य श्रीमती कविताताई भगत, विविध क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त गुणवंत नागरीक ,मुख्य आयोजक श्री विजयानंद (बाळू) पाटील व श्रीराम पाटील आदी मान्यवर शिक्षक वर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होते,
सामाजिक कार्याची आवड असलेले वसंत रामचंद्र पाटील हेअनेक सामाजिक संस्थेचे संस्थापक आहेत. काटई येथील यशवंत विद्यालयात प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असतांना १९७२ मध्येच ठाकुर्ली जिल्हा परिषद मतदारसंघातून ठाणे जिल्हा परिषदेवर निवडून आले. 
ते १९७२ ते १९७९ दरम्यान जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य समितीचे सदस्य, प्रतोद म्हणून त्यांनी काम केले. निळजे येथे संकल्प बहुउद्देशीय सामाजिक संस्थेची स्थापना व संचालन संस्थेमार्फत सर्वोदय, रवींद्रनाथ टागोर न्यू इंग्लीश स्कूल, सुमनताई वसंत पाटील ज्युनियर कॉलेजची स्थापना त्यांनी केली. या संस्थेमार्फत अनेक समाजाभिमुख उपक्रम त्यांनी राबविले. सर्वपक्षीय ग्रामीण विकास संघर्ष समितीच्या आंदोलनाचे संस्थापक सरचिटणीस म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. त्यातूनच पुढे कल्याण -डोंबिवली महापालिकेतून मुक्त झालेल्या २७ गावांमधील युवकांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली. गावातील विकासकामांमधून रोजगार मिळाला. मात्र पुन्हा या ग्रामपंचायतींचा समावेश महापालिकेत झाल्यावर ग्रामपंचायत म्हणजे काम करत असलेल्या कर्मचारी वर्गाला कल्याण – डोंबिवली महापालिकेत कायम रोजगाराची संधीही त्यांच्यामुळेच मिळू शकली. असे म्हणायला वावग ठरू नये, या २७ गावांच्या गुरचरण जमिनीत बोरिवलीतील झोपडपट्टी धारकांचे स्थलांतर करण्याचा घाट शासनाने घातला, शासनाला हा निर्णय रद्द करण्यासाठी गावरान बचाव समितीचे प्रमुख सल्लागार म्हणून त्यांनी भूमिका बजावली. नांदिवली येथील पिंपळेश्वर मंदिरावर कब्जा केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्या विरोधातही आंदोलन यशस्वी करून गावकऱ्यांना त्यांनी त्यांचा हक्क मिळवून दिला. 

वसंत रामचंद्र पाटील हे डोंबिवली येथील ठाणे जिल्हा आगरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रगती कॉलेजच्या स्थापनेपासून विश्वस्त सभासद आहेत. निळजे परिसरातील गरजूंसाठी विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व मोफत चष्मे वाटप, कार्यक्रम रोटरी ग्रामीण मंडळाच्या मार्फत राबविले. अनेक दिव्यांगांना विनामूल्य कुबड्या व तीन चाकी सायकल त्यांनी उपलब्ध करून दिल्या. जिल्ह्यातील देहदान मंडळाच्या कार्यातही त्यांचा सक्रीय सहभाग आहे. निळजे व परिसरातील ग्रामस्थांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी कल्याण – डोंबिवली महापालिकेला दवाखन्यासाठी अर्धवेळ जागा मिळवून दिली. वसंत पाटील हे परिसरातील सामाजिक, शैेक्षणिक व सांस्कृतिक कार्यात सदैव हिरीरीने नेहमीच पुढाकार घेत असतात त्यामुळे त्यांची निवड जीवनगौरव पुरस्कारासाठी केली गेली. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारासाठी दैनिक स्वराज्य तोरण परिवाराकडून तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *