1 min read

साळवे इंग्रजी विद्यालयाचे जिल्हास्तरीय शालेय क्रिडास्पर्धेत यश !….

Loading

साळवे इंग्रजी विद्यालयाचे जिल्हास्तरीय शालेय क्रिडास्पर्धेत यश !….

कु.रेणुका महाजन मुलीच्या कुस्त्यांमध्ये प्रथम !…..

धरणगांव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर

धरणगांव – साळवे इंग्रजी विद्यालय, साळवे येथील किमान कौशल्य विभागातील ईयत्ता बारावीची विद्यार्थींनी कु. रेणुका महाजन हिने जिल्हास्तरावरील हिवाळी क्रिडास्पर्धेत १९ वर्षाआतील मुलींच्या गटात चाळीसगाव येथे झालेल्या कुस्तींच्या सामन्यात प्रथम क्रमांक पटकावला त्यानिमित्ताने ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष डॉ. श्री गिरीश नारखेडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले आणि पुढील काळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी तीने प्रेरणादायी अनुभव सांगितले.
कु.रेणुका ला वर्गशिक्षक भरत गलापूरे, क्रिडा शिक्षक भूषण बोरोले, प्रभारी मुख्याध्यापक ए.एस.पाटील आणि सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले. तिचे कौतुक केले,अभिनंदन केले. आणि पुढील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *