शिक्षक आमदार नागो गाणार यांची शिक्षण अधिकाऱ्यांबरोबर बैठक संपन्न.
![]()


शिक्षक आमदार नागो गाणार यांची शिक्षण अधिकाऱ्यांबरोबर बैठक संपन्न.
ठाणे कल्याण(मनिलाल शिंपी) – महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नागपूर विभागाचे शिक्षक आमदार नागो गाणार यांनी ठाणे शिक्षण अधिकारी कार्यालयाला अचानक भेट दिली. ठाणे जिल्ह्यातून अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संस्था,व शाळांचे शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रकरणे प्रलंबित आहेत. अनावश्यक कागदपत्रांची मागणी करत प्रस्तावात त्रुटी काढत नाहक त्रास दिला जातो .ठाणे जिल्ह्यातून अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक कार्यालयाला भेट देत विविध विषयांवर चर्चा केली .वेतनेतर अनुदान, आर टी ई पुनर मान्यता ,भविष्य निर्वाह निधी पावत्या ,शिक्षक वैयक्तिक मान्यता, मुख्याध्यापक मान्यता,वैद्यकीय बिले,सेवानिवृत्ती प्रकरणे, माध्यमिक वेतन पत्रक कार्यालयाकडून होणारा निष्काळजीपणा अशा अनेक विषयांकडे लक्ष वेधून शिक्षण अधिकाऱ्यांना 31 डिसेंबर पर्यंत प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचना केल्या. शिक्षण अधिकाऱ्यांनी देखील प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे आश्वासन दिले . प्राथमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, माध्य. शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले ,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रांत अध्यक्ष वेनुनाथ कडू ,कोकण विभाग कार्यवाह शशिकांत चौधरी, कल्याण डोंबिवली महानगर कार्यवाह गुलाबराव पाटील, ठाणे महानगर महिला अध्यक्ष हेमलता मुनोत उपस्थित होते.

