राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात कार्यशाळा
![]()





राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात कार्यशाळा
पारोळा: राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 12 वी विज्ञान च्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक 06/12/2022 रोजी दुपारी 12 ते 1. 30 या कालावधीत जिल्हा जात पडताळणी समिती कडून कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उदघाटन कनिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्या डॉ. वंदना पाटील यांनी केले. कार्यशाळेत मार्गदर्शन जिल्हा जात पडताळणी समिती जळगाव येथील मा. ऐ. बी. पाटील साहेब व मा. नवल चव्हाण साहेब यांनी मार्गदर्शन केले. तसेच या कार्यशाळेत प्रमाणपत्र आपल्या दारी अंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात एकूण 14 विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. इयत्ता 12 वी विज्ञान च्या एकूण 227 विद्यार्थ्यांनी जात पडताळणीचे अर्ज सादर केलेले आहेत. या कार्यशाळेसाठी वरिष्ठ लिपिक श्री पी. एस. पाटील, प्रा. डॉ. ईश्वर एस. पाटील यांनी परिश्रम घेतले.

