1 min read

सारजाई कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयाच्या डॉजबॉल व खो-खो संघाची जिल्हाविजयी होऊन विभागावर मजल

Loading

▪️सारजाई कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयाच्या डॉजबॉल व खो-खो संघाची जिल्हाविजयी होऊन विभागावर मजल

धरणगांव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर

धरणगाव – येथील बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयाचे सतरा वर्ष आतील मुलींचा डॉजबॉलचा संघ व सतरा वर्ष आतील खो – खो चा मुलींचा संघ जिल्हास्तरावर प्रथम येऊन विभागावर निवड झाल्याबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष हेमलालशेठ भाटीया, सचिव प्रा.रमेश महाजन, सर्व संचालक मंडळ तसेच माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस एस पाटील, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जीवन पाटील, क्रीडाशिक्षक एस एल सूर्यवंशी, क्रीडाशिक्षक कैलास माळी यांनी गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केले.व विभागस्तरसाठी शुभेच्छा दिल्यात.तसेच सतरा वर्ष आतील मुलांचा डॉजबॉलचा संघ उपविजयी ठरला व चौदा वर्ष आतील मुलींचा खो खो चा संघ तृतीय ठरला.विजयी संघांचे शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. सर्व विजयी संघांना क्रीडाशिक्षक एस. एल.सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *