1 min read

धुळे जिल्हा शिक्षक पतपेढीचा नवा आदर्श….अध्यक्षपदी सौ हेमलता पाटील उपाध्यक्षपदी सौ संगीता चौधरी यांची निवड

Loading

धुळे जिल्हा शिक्षक पतपेढीचा नवा आदर्श….

अध्यक्षपदी सौ हेमलता पाटील उपाध्यक्षपदी सौ संगीता चौधरी यांची निवड

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
स्त्री शक्तीला शिक्षणाच्या माध्यमातून उजागर करणाऱ्या सावित्रीमाई फुलेंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून धुळे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक सहकारी पतसंस्थेचा कारभार स्त्री शक्तीच्या हाती सोपवून एक नवा आदर्श इतिहास निर्माण केला आहे .याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे..
धुळे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कारभार स्वीकारतांना सौ हेमलता पाटील व श्रीमती संगीता चौधरी.”जिच्या हाती दोरी ती जगाला उद्धारी ” या उक्ती प्रमाणे आणि शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे .. आणि तात्यासाहेब महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीयांसाठी शिक्षणाची कवाडे खुली केली अन् त्यांचे स्वप्न व मा . श्री . आण्णासो . एस के चौधरी व मा . श्री . बापूसो . एस . एम . पाटील आणि मा . बापूसौ आर .०ही . पाटील यांच्या प्रेरणेतून ‘ आशिर्वादाने व कुशल मार्गदर्शनातून व नविन बिनविरोध संचालक मंडळ यांनी एक मुखी निर्णय घेवून सन २०२२ – २३ या वर्षासाठी पतसंस्थेच्या चेअरमन पदी सौ. हेमलता देविदास पाटील व व्हा . चेअरमन पदी श्रीमती संगिता झुलाल चौधरी यांची बिनविरोध निवड केली . यासाठी सहाय्यक निवडणुक अधिकारी श्री . साळीसाहेब ‘ पतसंस्था सचिव साजिद शेख ‘ सर्व कर्मचारी वृंद यानी मेहनत घेतली . माजी चेअरमन विजय पवार, व्हाईस चेअरमन अ.भा.माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांनी उपस्थिती देवून मार्गदर्शन केले…

(नुतन पदाधिकारी व संचालक मंडळ यांचे ओबीसी शिक्षक असोसिएशन,महात्मा फुले हायस्कूल देवगांव देवळी ता.अमळनेर, मराठी लाईव्ह न्युज, महाराष्ट्र पत्रकार संघ यांच्या वतीने मनापासून अभिनंदन ! व शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *