1 min read

कृषी संस्कृतीची कास धरुनच सांस्कृतिक कार्य करावे लागेल : अरविंद खैरनार

Loading

कृषी संस्कृतीची कास धरुनच सांस्कृतिक कार्य करावे लागेल : अरविंद खैरनार
[ सत्यशोधक समाज संघ अधिवेशनानिमित्त मेरॅथॉन प्रचार प्रसार ]
कृषी संस्कृतीची कास धरूनच सांस्कृतिक कार्य करावे लागेल.खंडोबा, महासुभा,कुळदेवी हेच आमचे मूळ दैवत असून त्यांचेच सण उत्सव साजरे करूयात असे आवाहन अरविंद खैरनार ( सत्यशोधक समाज संघाचे राज्य संस्थापक अध्यक्ष ) यांनी केले .चोपडा तालुक्यातील अडावद येथे दि .३ डिसेंबर २०२२ रोजी खालचा माळी वाड्यातील समाज मंदिरात संपन्न झालेल्या प्रचार सभेत खैरनार बोलत होते. मार्गदर्शनात खैरनार पुढे म्हणाले की ,” जळगाव जिल्ह्यात सत्यशोधक चळवळीची खूप मोठी परंपरा लाभलेली आहे.धर्माच्या होत असलेल्या आर्थिक शोषणाविरुद्ध बहुजन समाजाचे शोषण थांबवण्यासाठी महात्मा फुले यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.अडावद गावात सुद्धा सत्यशोधक समाजाचे विधीकर्ते झालेले आहेत. त्यांचा वारसा पुढील पिढीने चालवावा असे आवाहनही खैरनार यांनी केले.विसाव्या शतकाच्या प्रारंभी लासूर, चहार्डी,हातेड,चोपडा या ठिकाणी सत्यशोधकांनी ऐतिहासिक कार्य केल्याच्या उल्लेखनीय नोंदी आढळतात हे त्यांनी संदर्भासह स्पष्ट केले. विधीकर्ते भगवान रोकडे यांनी ब्राह्मणाशिवाय साक्षगंध, लग्नविधी , विवाह आनंद उत्सवविधी कशा कराव्या हे समजावून सांगितले.विधीकर्ते शिवदास महाजनांनी धार्मिक शोषणमुक्त समाजाची संकल्पना मांडली.जिल्हा आयोजन समिती सदस्य विजय लुल्हे यांनी युगपुरुष महात्मा जोतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधकी समाजांतर्गत केलेले अतुलनीय क्रांतदर्शी ऐतिहासिक समाजकार्य सांगितले.याप्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते हनुमंतराव महाजन यांनी मार्गदर्शन केले.प्रारंभी सत्यशोधक समाज संघाचे राज्याध्यक्ष व कार्यकर्त्यांचे हृद्य स्वागत करण्यात आले. तत्पुर्वी सुधाकर महाजन यांनी प्रस्तावना करून मान्यवरांचा संक्षेपाने परिचय करून दिला.कार्यक्रमास जीवन माळी ( उपाध्यक्ष,क्षत्रिय काच माळी समाज खालचा वाडा बहुउद्देशीय संस्था, अडावद ),माजी सरपंच साखरलाल महाजन,संदीप महाजन,पत्रकार पी.आर.माळी ,रवींद्र महाजन,मनोहर महाजन,संजय महाजन ,बी.पी.महाजन ज्ञानेश्वर महाजन,प्रल्हाद महाजन आणि बहुसंख्य समाज कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित सत्यशोधकीय कार्यकर्त्यांनी अधिवेशना साठी उत्स्फुर्त आर्थिक सहकार्य केले.बैठकीच्या यशस्वितेसाठी सुधाकर महाजन यांनी अमूल्य परीश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *