1 min read

मुक्ताईनगर तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघाची पारंबी विद्यालयात मासिक सभा संपन्न

Loading

मुक्ताईनगर तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघाची पारंबी विद्यालयात मासिक सभा संपन्न

मुक्ताईनगर तालुका मुख्याध्यापक संघाची मासिक सभा नुकतीच नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी येथे नुकतीच संपन्न झाली. याप्रसंगी या सभेचे अध्यक्ष मुक्ताईनगर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा जे. ई. स्कूलचे प्राचार्य श्री. आर. पी. पाटील सर होते या सभेला प्रमुख उपस्थिती मुक्ताईनगर तालुका शा.पो.वा.चे तालुका अधिक्षक श्री. अजित तडवी साहेब मुख्याध्यापक संघाचे जळगाव जिल्हा सहकोषाध्यक्ष तथा सुकळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रदीप दाणे सर तसेच मुख्याध्यापक संघाचे तालुका सचिव तथा स्व. अशोक फडके माध्यमिक विद्यालय कुर्हा कु-हा, काकोड्याचे मुख्याध्यापक श्री. व्ही. एस. चौधरी सर आदी मान्यवरांचा नवीन माध्यमिक विद्यालय पारंबीचे मुख्याध्यापक श्री. समाधान पाटील यांनी शाल व गुलाब बुके देऊन सत्कार केला. त्याचप्रमाणे प्रसंगी चारठाणा आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री. संदीप पाटील सर यांना नुकताच राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याबद्दल त्यांचा नवीन माध्यमिक विद्यालयायाचे मुख्याध्यापक श्री. समाधान पाटील, ज्येष्ठ शिक्षक डॉ. शिवचरण उज्जैनकर श्री. राजेभाऊ राठोड श्री. सुनील पाटील श्री. सुनील नानगे शिक्षकेतर श्री. रघुनाथ इंगळे श्री. विनायक इंगळे श्री. संदीप पाटील यांचा शाल व गुलाब बुके देऊन सत्कार केला. मुख्याध्यापक संघाची ही सभा पारंबी विद्यालयात प्रथमच होत असल्याने ज्येष्ठ शिक्षक डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी सर्व सन्माननीय मुख्याध्यापकांचे शब्द सुमनांनी स्वागत केले व सर्व शिक्षक बंधूंनी उपस्थित सन्माननीय मुख्याध्यापकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. याप्रसंगी सूत्रसंचालन डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी केले.
याप्रसंगी मुख्याध्यापक संघाच्या सभेमध्ये विविध विषयावर चर्चा होऊन पुढील नियोजन करण्यात आले. सभा आनंदात संपन्न झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *