1 min read

सत्यशोधक समाज अधिवेशन ऐतिहासिक होणार-जेष्ट साहित्यिक जयसिंग वाघ

Loading

सत्यशोधक समाज अधिवेशन ऐतिहासिक होणार जयसिंग वाघ

भुसावळ :- दिनांक 11 डिसेम्बर रोजी भुसावळ तालुक्यातील कुर्हे पानाचे येथे आयोजित दूसरे सत्यशोधक समाज अधिवेशन हे सुमारे ८९ वर्षोंनंतर होत असल्याने ते एक ऐतिहासिक ठरणार आहे असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले
सत्यशोधक समाज अधिवेशन सम्पर्क कार्यालय उदघाटन व भित्तीपत्रकाचे प्रकाशन दिनांक ४ डिसेम्बर रोजी वाघ यांच्या हस्ते करण्यात आले असता ते बोलत होते
जयसिंग वाघ यांनी आपल्या भाषणात पुढं सांगितलेकि हे गांव सत्यशोधक चळवळीत अग्रेसर होते तसेच या गावास मोठा ऐतिहासिक वारसाहि लाभला आहे हा इतिहास लक्षात घेऊन जनतेने सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन ही वाघ यांनी केले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक समाज संघाचे राज्य सचिव डॉ सुरेश झालटे होते त्यांनी अधिवेषणाच्या नियोजना बाबत मार्गदर्शन केले तसेच जिल्हाभर केलेल्या दौऱ्यास मिळालेल्या प्रतिसादाची विस्तृत माहिती दिली
सूत्रसंचालन सुधाकर बडगुजर , प्रास्ताविक नाना शामराव पाटील , आभार प्रमोद उम्बरकर , परिचय विलास रदाळे यांनी तर स्वागत संजय वराड़े यांनी केले कार्यक्रमास स्त्री पुरूष मोठ्या संखेने हजर होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *