1 min read

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त समग्र शिक्षा अभियान गट संसाधन केंद्र,पंचायत समिती पारोळा व चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने “जनजागृती रॅली

Loading

आज दि. 3 डिसेंबर 2022 जागतिक दिव्यांग दिनानिमित्त समग्र शिक्षा अभियान गट संसाधन केंद्र,पंचायत समिती पारोळा व चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने “जनजागृती रॅली काढण्यात आली.जि.प.शाळा नं 1 पासून , रॅली ला हिरवा झेंडा दाखवून रॅली ची सुरुवात करण्यात आली.यावेळी चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळेचे अध्यक्ष अण्णासाहेब योगेश रघुनाथ महाजन सर हे उपस्थित होते.तसेच शाळेचे मुख्या.मनीष जाधव, हेमंत महाजन, जगदीश सोनवणे, रामकृष्ण शेलकर, एस.एस.पाटील मॅडम,व्ही.एल.पाटील मॅडम, संगीता महाजन मॅडम,विवेक पाटील,राजेंद्र महाजन ,राजु माळी इ.कर्मचारी उपस्थित होते. पंचायत समिती पारोळा, गट साधन केंद्रातुन ( शिक्षण विभाग) IEकेंद्रातून श्रीमती नंदादेवी पाटील मॅडम, IED समन्वयक श्रीमती छाया महाजन मॅडम, केंद्रप्रमुख श्री भटु पाटील सर, अभियंता रावसाहेब श्री.मोरे सर तसेच विशेष शिक्षक प्राथमिक व माध्यमिक सर्वांनी दिव्यांग दिनाचे औचित्य साधून 3 डिसेंबर रोजी परिश्रम मतिमंद मुला मुलींची निवासी शाळा , पारोळा येथील विद्यार्थ्यांसह रॅली चे आयोजन करण्यात आले होते.विशेष शिक्षक विषय तज्ञ व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *