1 min read

शिक्षक विशाल पाटील यांचा वाढदिवस केला चिमुकल्यांनी साजरा..

Loading

आमच्या शाळेतील माजी शिक्षक श्री. विशाल जयसिंग पाटील सर यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी दोन दोन, पाच पाच रुपये जमा करून केक आणून वाढदिवस साजरा केला. सर शाळेवर तात्पुरत्या नियुक्तीवर होते आणि दिवाळी नंतर त्यांच्या पूर्वीच्याच नगाव शाळेत रुजू झाले होते तरीही मुलांनी त्यांना फोन करून आज शाळेत बोलवून वाढदिवस साजरा केला. तसेच त्यांना जातांना सासृनयनांनी निरोप ही दिला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले होते. फक्त 4,5 महिन्यातच विद्यार्थ्यांना सरांचा खूप लळा लागल्याचे व कमी कालावधीत सरांनी मुलांना व शाळेला आपलेसे केल्याचा प्रत्येय आला. शाळेतर्फे सरांना पुढील शैक्षणिक वाटचालीच्या शुभेच्छा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *