सामाजिक बांधिलकी जोपासणारे व्यक्तिमत्व तथा लोकनियुक्त सरपंच ताईसो सुषमाताई पाटील..
![]()


सामाजिक बांधिलकी जोपासणारे व्यक्तिमत्व तथा लोकनियुक्त सरपंच ताईसो सुषमाताई पाटील..
कर्मवीर भाऊराव पाटील आपल्या शब्दात म्हणतात, तुम्हाला काही महिन्यासाठी तरतूद करायची असेल तर धान्य पेरा, काही वर्षासाठी तरतूद करायची असेल तर फळ झाडे लावा आणि पिढ्यांसाठी तरतूद करायची असेल तर माणसं पेरा..!
असेच अमळनेर तालुक्यातील ज्यांना सामाजिक कार्याचा वसा आपल्या कुटुंबातून मिळाला व निरंतर अशी समाजसेवा करत गेले त्याचे फळ त्यांना मिळाले व पहिल्या महिला लोकनियुक्त सरपंच होण्याचा मान मिळाला अशा
लोकनियुक्त सरपंच सौ. सुष्माताई पाटील जिल्हाध्यक्ष सरपंच परिषद जळगाव या आहेत…
ताईंनी कोरोना काळात अत्यंत प्रामाणिकपणे जन माणसाची सेवा केली.. कोरोनावर मात करण्यासाठी गावात स्वच्छतेला अधिक महत्त्व देत जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली. ताईंनी बिहार पॅटर्न दहिवद सारख्या गावात आणून गावात अनेक झाडे लावण्याचा मानस करत तो कृतीत आणला ..
ताईंनी गावाचे नाव राज्यात नव्हे तर देशभर त्याची चर्चा होत अभिनंदनही केले.. ताईंच्या उत्कृष्ट कार्याची दखल अनेक स्वयंसेवी संस्थां व शासनाने घेत ताईंनां अनेक पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले…
ही अभिमानास्पद गोष्ट आहे एक महिला दहिवद सारख्या छोट्याशा गावात प्रामाणिकपणे काम करत लोकनियुक्त सरपंचपद प्रभावीपणे सांभाळत गावाच्या विकासासाठी कटिबद्ध झाल्या.. गावाचा चेहरामोरा बदलवण्यासाठी त्यांना गावातील अनेक ज्येष्ठ व्यक्तींनी सहकार्य केले.. गावाच्या विकासासाठी स्वतःला वाहून घेतले गावात कोणताही प्रश्न असेल तो मार्गी लावण्यासाठी सतत प्रयत्न करत राहिले..
गावाच्या विकासाठी दहीवद गावासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणण्यात त्यांना यश मिळालं हे तेवढेच सत्य…. बेटी बचाओ,बेटी पढावो हा कार्यक्रम त्यांनी गावात राबवत अनेक तळागाळातल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले…
जिल्हा परिषद जळगांव, अमळनेर तालुक्याचे आमदार ,जिल्हा परिषद सदस्य यांनी त्यांना नेहमीच चांगल्या कामासाठी सहकार्य केले…
समाजात काही माणसे आपल्या कर्तुत्वाने इतकी मोठी व आदरणीय होतात त्यामुळे ते समाजाचे भूषण व अलंकार बनतात त्यांच्या कामामुळे तो समाज ओळखला जातो.. आपल्या जीवनात जसे बोलले तसे वागले, असे आमच्या ताईसो सुष्माताई पाटील होय..
माणसं जोडणे हा त्यांचा व्यासंग त्यामुळे त्यांनी अनेक नातेवाईक मित्रपरिवार त्यांचा गोतावळा निर्माण केला नवे त्यांच्या संगोपन आणि जतन तन-मन-धनाने करतात. आम्हा सर्वांना धीर व आधार देतात म्हणूनच त्यांना आम्ही ‘आधारवड’ म्हणून पाहतो. कधीकधी स्वतः मात्र अंतकरणाने दुःखी असला तरी पण त्यांची आम्हाला झळ पोहचू देत नाही हे मी अनेक वेळा अनुभवले आहे..
त्यांचे मिस्टर आमचे मित्र कर्तबगार पोलीस अधिकारी दादासाहेब वासुदेव देसले यांचे नेहमीच त्यांना मार्गदर्शन मिळत असते..
कधी कधी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला अनेक वाईट गोष्टींना सामोरे जावे लागते.. ताई कधीही डगमगल्या नाही, ताईंचे कार्य सुरूच आहे. ज्यांना सामाजिक कार्याची आवड असते त्याला कोणत्याही पदाची अपेक्षा असत नाही.. पद असो नसो ते नेहमीच आपल्या सामाजिक कामांना प्राधान्य देतात हा त्यांचा विशेष गुण उल्लेखनीय आहे ताई या मितभाषी , अभ्यासू आहेत त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे त्या भावी जिल्हा परिषद सदस्य निश्चितच आहेत कारण त्यांना मानणारा वर्ग ग्रामीण भागात मोठा आहे ताईंच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या इच्छा आकांक्षा गगनाला भिडू दे,चांगले आरोग्य मिळो हयाच शुभेच्छा..
त्यांच्यासाठी दोन वाढदिवसाच्या निमित्ताने शब्द…
प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या सागाराला
किनारा नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढील आयुष्य सुखसमृद्धि आणि
ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा..
संकलन
ईश्वर आर महाजन
मुख्यसंपादक
मराठी लाईव्ह न्युज
9860352960

