नर्मदा परिक्रमा म्हणजे भक्ती, शक्ती ,सहनशक्तीचे ऊर्जास्तोत्र .. ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे
1 min read

नर्मदा परिक्रमा म्हणजे भक्ती, शक्ती ,सहनशक्तीचे ऊर्जास्तोत्र .. ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे

Loading

नर्मदा परिक्रमा म्हणजे भक्ती, शक्ती ,सहनशक्तीचे ऊर्जास्तोत्र .. ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे

पुणे वडगाव शेरी: संयम, विश्वास व अहंकाराचा नाश करणे म्हणजे नर्मदा परिक्रमा होय. ऋषी मार्कंडेय यांनी हजारो वर्षांपूर्वी नर्मदा परिक्रमा केली आहे. पायात चामड्याच्या वस्तू न वापरता सात्विक भोजन करून , आत्मिक शक्ती जागृत करून,ही परिक्रमा करतात. नर्मदेच्या पवित्र उगमा पासून तर शेवट अमरकंटक किंवा ओंकारेश्वर येथे ही परिक्रमा संपन्न होते. ही परिक्रमा येथील हरी प्रल्हाद बढे यांनी पूर्ण करून एक प्रकारचे तपच केलेले आहे. भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये 18 व्या अध्यायातील एका श्लोकात सांगितलेले आहे की प्रत्येकाने जीवनामध्ये यज्ञ,दान, तप आणि कर्म करायला पाहिजे, असे सांगितले आहे.परंतु कलियुगामध्ये ह्या गोष्टी करायला वेळ नसतो. तपस्वी श्री हरी प्रल्हाद बढे व डॉ. हरी निवृत्ती पाटील यांनी 3600 किलोमीटर अंतर 105 दिवसांमध्ये पूर्ण केले. जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या कालखंडामध्ये वेळात वेळ काढून ही परिक्रमा पूर्ण केली त्य व एक प्रकारचे तपाचे सामर्थ्य प्राप्त केले. नर्मदा परिक्रमा म्हणजे भक्ती ,शक्ती व सहन शक्तीचे ऊर्जा स्तोत्र होय असे मत ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे उरुळी कांचन यांनी येथे व्यक्त केले. नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल येथे वीरशैव लिंगायत सेवा मंडळ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉक्टर रवींद्र भोळे यांचे शुभ हस्ते श्री हरी प्रल्हाद बढे यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करताना ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ.मणीभाई
मानवसेवा ट्रस्ट, वैद्यकीय विभाग प्रमुख वारकरी मंच महाराष्ट्र राज्य,पुढे म्हणाले की वारकरी संप्रदायातील हरी प्रल्हाद बढे यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आत्मिक शांती, अंतरिक ऊर्जा व निष्काम सेवाभाव निर्माण केलेला आहे. आणि आज त्यांचे कडून तपश्चर्या घडून, अन्नदान होत आहे. यापासून आदर्श घ्यावा की सत्कर्म करण्यासाठी वेळ नसतो ,वेळ द्यावा लागतो. मनुष्य नश्वर आहे, जीवनभर मनुष्य मोहमायाजालमध्ये फसलेला असताना अशा धार्मिक आणि अध्यात्मिक क्षेत्रामध्ये काही तास का होईना आत्मिक शांतीसाठी घालवणे महत्त्वाचे आहे. मोक्ष प्राप्तीसाठी व कर्मफळ मुक्तीसाठी नर्मदा परिक्रमा अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ अण्णासाहेब साहेब पाटील, डॉ. हरी निवृत्ती पाटील, आदिशक्ती मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष अमोल पाटील, मुरलीधर खर्चे सहसचिव भ्रातृ मंडळ पुणे ,तपस्वीश्री हरी प्रल्हाद बढे, नारायण प्रल्हाद बढे, सौ मंदाकिनी नारायण बढे ,अंकुर हरी बढे, सौ ममता अंकुर बढे, सौ सविता हरी बढे , व्यासपीठावर प्रमुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सौ सविता हरी बढे, श्री अंकुर हरी बढे, ह्यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अंकिता अ नारखेडे, सौ स्नेहल बारदोषकर यांनी केले. या कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवर भाविक भक्त व वारकरी संप्रदायातील अनेक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *