स्काऊट-गाईड एकदिवसीय प्रशिक्षण शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्त्व आणि सेवा भावनेची वाढ
![]()
*पुस्तकाबाहेरचे जग*
*स्काऊट व गाईड एकदिवसीय शिबीर*
ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथील
स्काऊट-गाईड विभागातर्फे एकदिवस प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, नेतृत्त्वगुण, स्वयंसेवा वृत्ती आणि स्वावलंबन विकसित करणे हा होता.
शिबिराची सुरुवात प्रार्थना व ध्वजवंदन कार्यक्रमाने झाली.सदर शिबीराचे उद्घाटन सेवानिवृत्त कलाशिक्षक व माजी स्काऊट विभाग प्रमुख मा.श्री.सतीष भोळे यांच्याहस्ते करण्यात आले.सदर कार्यक्रमात मुख्याध्यापिका श्रीमती.प्रणिता झांबरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना स्काऊट-गाईडचे महत्त्व सांगून मार्गदर्शन केले.
प्रशिक्षक श्री.पराग राणे यांनी विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार व श्री.चेतन सोनार व श्री.वेदप्रकाश आर्य यांनी गाठी-बंधने,श्री.महेंद्र मिरकुटे यांनी आपत्ती व्यवस्थापन व उपाययोजना
,श्री.चंद्रकांत कोळी यांनी स्काऊट चळवळीचा इतिहास तर श्री.रफिक तडवी यांनी
शिस्तबद्ध संचलन, मैदानी खेळ
,श्री.धिरज चौधरी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम व श्री.एकनाथ पाचपांडे व संदेश करलकर यांनी
स्वच्छता अभियान
यांसारख्या क्रियाकलापांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले.
त्यानंतर गटानुसार विविध उपक्रम, तंबु उभारणी व सजावट, बिन भांड्याचा स्वयंपाक, बचाव प्रशिक्षण आणि संघभावना वाढविणारे खेळ घेण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
शिबिराचा समारोपाप्रसंगी मा.पर्यवेक्षक श्री.नरेंद्र पालवे यांच्या उपस्थितीत ‘राष्ट्रीय प्रतिज्ञा’ आणि धन्यवाद प्रस्तावाने करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त, सहकार्य आणि सेवा वृत्तीची जाणीव अधिक दृढ झाली.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री.डि.ए.पाटील.,श्री.महेंद्र नेमाडे,श्री.बि.डी.झोपे.शिक्षकेतर कर्मचारी श्री.अनिल शिवदे,श्री.शुभम तायडे ,तुषार सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

