लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा कोकण- मुंबई मासिक विचारमंथन मेळावा संपन्न*! *सामाजिक आणि पत्रकार कल्याण कार्यातील सहकार्याबद्दल मा.मुख्यमंत्र्यांचे आभार..!*
![]()
*लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा कोकण- मुंबई मासिक विचारमंथन मेळावा संपन्न*!
*सामाजिक आणि पत्रकार कल्याण कार्यातील सहकार्याबद्दल मा.मुख्यमंत्र्यांचे आभार..!*
*तरूणाई फाउंडेशनच्या ७ व्या अकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलनातील पुरस्कार,आय कार्ड व हार्ट अटॅकवर उपचारसुरू होईपर्यंत तात्पूरता तातडीचा इलाज असलेल्या रामरक्षा किटचे वाटप….राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगे बाबा यांना वंदन…अभिवादन..!*
*देशातील शहिद जवान,आत्महत्याग्रस्त शेतकरी,अत्याचारग्रस्त महिला बळी,चिमुकली “यज्ञा”,दिवंगत पत्रकार,आपत्ती व अपघातग्रस्त बळींना सामुहिक श्रध्दांजली..!*
*अकोला* – लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या कोकण- मुंबई सभासदांचा ८ वा विचारमंथन मेळावा दादर पश्चिम मधील विदर्भ मंदिर विश्वस्त संस्थेच्या सभागृहात संपन्न झाला.संघटनेच्या समतावादी नव्या पायंड्यानुसार कोकण प्रभारी व पालघर जिल्हाध्यक्ष,”नवा हाल” वृत्तपत्राचे संपादक मा.जगदिशप्रसाद करोतिया हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.यावेळी विदर्भ मंदिर विश्वस्त संस्थेचे सचिव,बेस्ट कामगार संघटनेचे सेक्रेटरी तथा भाजप कामगार आघाडीचे राज्य उपाध्यक्ष मा.गजाननभाऊ नागे हे विशेष प्रमुख अतिथी,तर लोकस्वातंत्र्य संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख,राष्ट्रीय पदाधिकारी पुष्पराज गावंडे,महाराष्ट्र संघटन प्रमुख,मंत्रालयीन समन्वयक रफिक मुलानी यांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यकमाध्यक्ष व श्री.गजाननजी नागे यांचे सन्मानचिन्ह,शाल व पुष्पगुच्छांनी सत्कार करण्यात आले. लोकस्वातंत्र्य व विदर्भ मंदिर संस्था गाडगेबाबांच्या संदेशानुरूप सोबत सोबत काम करू असे प्रतिपादन करून,त्यांनी,करोतिया व पुष्पराज गावंडे यांनी संघटना व अध्यक्षांच्या अविरत कार्याचा गौरव केला.
संजय देशमुख यांनी संघटनेची वाटचाल, महत्व,जाहिरात,पत्रकार हल्ला प्रकरणे व ईतर सामाजिक प्रश्नांबाबत मिळालेल्या सहकार्यासाठी मुख्यमंत्री मा.ना.देवेन्द्र फडणवीस यांचे यांचे आभार मानलेत.आगामी जुलै २०२६ घ्या कुंभमेळ्यासाठी लघू- मध्यम वृत्तपत्रांना व शासकिय यादीत नसलेल्यांना सुध्दा यासह वर्षभरातील चार दर्शनी जाहिराती सुरू करण्याची मागणी, तसे मुख्यमंत्र्यांकडून माहिती जनसंपर्कला कळविण्यात आल्याची माहिती संघटना अध्यक्ष संजय देशमुख यांनी दिली.
याप्रसंगी तरूणाई फाउंडेशनच्या अकोला जिल्हा साहित्य संमेलनात जाहिर झालेले विवेकानंद युवा श्री,समारत्न जीवन गौरव,व सावित्रीबाई फुले महिला नारीरत्न,समाजरतन् व पत्रकार दर्पण गौरव दर्पण राज्यस्तरीय असे वेगवेगळे पुरस्कार जगदिशप्रसाद करोतिया, (बोईसर)रफिक मुलानी, (मुंबई) सुषमा ठाकूर-ढोले (डो़बिवली) संतोष घरत व देवेन्द्र मेश्राम(बोईसर)यांना संमेलन स्वागताध्यक्ष संजय एम.देशमुख व अतिथींच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी विनोद चाळके,सौ.सुषमा ढोले- ठाकूर ,कमलेश कुबल,देवेन्द्र मेश्राम,विनायक ठाकूर,व अनेक सभासद उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन विनोद चाळके यांनी केले.
=================================

