मिशन यश स्कॉलरशिप हा उपक्रम तालुक्यात प्रभावीपणे राबवा-विजय पवार गटशिक्षणाधिकारी पाचोरा*  *केंद्र स्तरीय शिष्यवृत्ती कार्यशाळा उत्साहात संपन्न*
1 min read

मिशन यश स्कॉलरशिप हा उपक्रम तालुक्यात प्रभावीपणे राबवा-विजय पवार गटशिक्षणाधिकारी पाचोरा* *केंद्र स्तरीय शिष्यवृत्ती कार्यशाळा उत्साहात संपन्न*

Loading

 

*मिशन यश स्कॉलरशिप हा उपक्रम तालुक्यात प्रभावीपणे राबवा-विजय पवार गटशिक्षणाधिकारी पाचोरा*

*केंद्र स्तरीय शिष्यवृत्ती कार्यशाळा उत्साहात संपन्न*

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिंचपुरे ता. पाचोरा येथे ‘स्कॉलरशिप व नवोदय स्पर्धा परीक्षा तयारी–मार्गदर्शन कार्यशाळा ’ या उपक्रमाचा प्रेरणादायी शुभारंभ उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे उदघाटन गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले आणि विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सुभाष देसले सर यांनी करत कार्यक्रमाचा हेतू व अपेक्षित कार्यवाही याची माहिती दिली.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नियोजित सराव सत्रे, मार्गदर्शन व्याख्याने आणि प्रश्नसंच अभ्यास या घटकांवर भर देण्यात येणार असल्याचे प्रास्ताविकात नमूद केले. या उपक्रमामागील प्रमुख प्रेरणा मा. मीनल करणवाल मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. जळगाव यांची असून त्यांच्या प्रेरणेतून गुणवत्तावर्धनाचा संकल्प पुन्हा दृढ करण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी समाधान पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती सरोज गायकवाड मॅडम,पिंपळगाव हरे केंद्राचे केंद्र प्रमुख सखाराम महाजन, मुख्याध्यापक महालपुरे सर त्याचबरोबर केंद्रातील मुख्याध्यापक, शिक्षक ,तसेच गावातील मान्यवर व पालक उपस्थित होते.गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांनी अध्यक्षीय मनोगतात स्पर्धा परीक्षांची तयारी ही सातत्य, मार्गदर्शकांचे प्रयत्न आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीवर आधारलेली असावी, असे प्रतिपादन केले.तसेच मिशन यश स्कॉलरशिप हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन केले. नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षांसाठी अभ्यासक्रम कृती आराखडा,वेळापत्रकानुसार सराव चाचण्या, शंकानिरसन सत्रे आणि पालक–विद्यार्थी संवाद या उपाययोजना राबविण्याचे आवाहन त्यांनी केले. विषयवार कार्यशाळा, आणि गुणविश्लेषण पत्रकांच्या आधारे विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन देण्याची रणनिती जाहीर करण्यात आली. मुकेश पाटील सर यांनी आभार प्रदर्शन करून मान्यवर, शिक्षकवृंद, पालक यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि उपक्रम सातत्याने राबविण्याची ग्वाही दिली. या कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन आणि पद्धतशीर तयारीचा नवा मार्ग मिळाल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *