मुलींना प्रोत्साहन देणे काळाची गरज”- कुमुदिनी पाटील कुमुदिनी पाटील सुरक्षा अधिकारी पदी निवड- सत्कार संपन्न
![]()
” मुलींना प्रोत्साहन देणे काळाची गरज”- कुमुदिनी पाटील
कुमुदिनी पाटील सुरक्षा अधिकारी पदी निवड- सत्कार संपन्न
जळगाव- ” मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हे काळाची गरज आहे असे प्रतिपादन सुरक्षा अधिकारी पदी निवड झालेल्या कुमुदिनी पाटील यांनी केले. आपल्या सत्कार समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या.
कुमुदिनी जयश्री अतुल पाटील यांची नुकतीच महिला व बालकल्याण विभागाच्या सुरक्षा अधिकारी पदी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून निवड झालेली आहे. राज्यशास्त्र विषयात उच्च पदवीधर असणाऱ्या कुमुदिनी पाटील या ए टी झांबरे विद्यालयाचे उपशिक्षक अतुल पाटील यांच्या सुकन्या आहेत.
कुमुदिनी पाटील यांच्या यशाबद्दल नुकतेच त्यांच्या पालकांसह सत्काराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी वनविभागाचे जेष्ठ अधिकारी जितेंद्र पाटील तसेच निवृत्त लेखापाल एन. टी. पाटील, इतिहास अभ्यासक व प्रसिद्ध वक्ते रामचंद्र पाटील, नोबेल फाउंडेशनचे संस्थापक जयदीप पाटील, नोबेल फाउंडेशनचे संचालक राजेंद्र पाटील, सिद्धिविनायक हायस्कूलचे आर.एस.पाटील तसेच निवृत्त सैनिक रमेश पाटील यांच्या उपस्थितीत सत्कार संपन्न झाला.
पुढे बोलताना कुमुदिनी पाटील म्हणाल्या की मुलींमध्ये अनेक क्षमता असतात फक्त मुलींना प्रोत्साहनाची गरज असते. आपल्या देशाला विकसित करावयाचे असेल तर श्री शिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे असेही त्या म्हणाल्या याप्रसंगी इतिहासकार रामचंद्र पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील यांनी केले आभार प्रदर्शन आर एस पाटील यांनी मानले.
फोटो कँप्शन
कुमुदिनी पाटील हिचा सत्कार करताना वनविभाग अधिकारी जितेंद्र पाटील ,एन टी पाटील, सोबत अतुल पाटील, जयश्री पाटील ,आर एस पाटील ,जयदीप पाटील रमेश पाटील, रामचंद्र पाटील ,राजेंद्र पाटील

