शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती जळगाव जिल्ह्याची बैठक जामनेर येथे उत्साहात संपन्न. पतपेढीच्या पहिल्या महिला अध्यक्षा श्रीमती सोनम पाटील यांचा भव्य सत्कार
![]()
शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती जळगाव जिल्ह्याची बैठक जामनेर येथे उत्साहात संपन्न.
पतपेढीच्या पहिल्या महिला अध्यक्षा श्रीमती सोनम पाटील यांचा भव्य सत्कार
जामनेर (प्रतिनिधी) – माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती, जळगाव जिल्हा यांची महत्त्वपूर्ण बैठक जामनेर येथे कन्या माध्यमिक विद्यालय, वाकी रोड येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ मार्गदर्शक प्रा. पी. एस. सोनवणे सर होते.
बैठकीस समितीचे अध्यक्ष गिरीश नेमाडे, कार्याध्यक्ष पी. ए. पाटील, समन्वयक तुळशीराम सोनवणे, प्र. ह. दलाल, शुद्धोधन सोनवणे, डॉ. मिलिंद बागुल, उपाध्यक्ष पी. बी. नरवाडे, सचिव सुरेश अहिरे, खजिनदार सुनील वानखेडे, प्रसिद्धी प्रमुख दिनेश पाटील, प्रवीण धनगर, महिला प्रतिनिधी सुनीता खडके, सुनीता पाटील, अश्विनी पाटील, तसेच कार्यकारिणी सदस्य संतोष कचरे, अनिल मनोरे, विकास चौधरी, शरद पाटील, उर्दू प्रतिनिधी नदीम शेख, इब्राहीम, गरुड विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एस. चौधरी (शेंदुर्णी), एम. एच. मेश्राम (फत्तेपुर), अनिल चव्हाण, अनिल अहिरे, सुभाष न्हाळदे, प्रेम झवंर, यशवंत शिरोळे, किरण तायडे,शशिकांत राणेराजपूत यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीच्या इतिहासातील पहिल्या महिला अध्यक्ष श्रीमती सोनम शिवाजी पाटील यांचा समन्वय समितीकडून भव्य सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे, पतपेढीचे माजी अध्यक्ष व जेष्ठ शिक्षक नेते संभाजी पाटील यांचाही भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
बैठकीदरम्यान प्र. ह. दलाल यांनी 1977 च्या सेवा शर्ती नियमावलीवर सखोल मार्गदर्शन केले. प्रशासनिक व शैक्षणिक समस्यांवर सुरेश अहिरे व डॉ. मिलिंद बागुल यांनी उपाययोजनांचा मार्ग सुचवला. शुद्धोधन सोनवणे यांनी शिक्षक व शिक्षकेतरांच्या प्रलंबित प्रश्नांवर भाष्य केले.
समन्वयक तुळशीराम सोनवणे यांनी आगामी आंदोलने, निवेदने व शिष्टमंडळ भेटींचे नियोजन याविषयी सविस्तर माहिती दिली. कार्याध्यक्ष पी. ए. पाटील आणि मुख्याध्यापक आर. एस. चौधरी यांनी संघटनेच्या बळकटीकरणावर भर दिला.
या वेळी पी. एस. सोनवणे व संभाजी पाटील यांनी संघटनेच्या कार्याची प्रशंसा करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तालुक्यातील महिला, उर्दू माध्यम प्रतिनिधी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन खजिनदार सुनील वानखेडे यांनी तर आभार प्रदर्शन डी.एड. महासंघाच्या जामनेर तालुका अध्यक्षा अश्विनीताई पाटील यांनी केले. या यशस्वी कार्यक्रमासाठी दीपक पाटील, दिनेश पाटील, दीपक माळी, नीरज चौधरी, गजानन कचरे, आत्माराम ठाकरे, गजानन भाऊ पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

