वृक्ष संवर्धनाची शिकवण देणारा शिक्षक – योगेश सनेर यांचा प्रेरणादायी उपक्रम”
1 min read

वृक्ष संवर्धनाची शिकवण देणारा शिक्षक – योगेश सनेर यांचा प्रेरणादायी उपक्रम”

Loading

वृक्ष संवर्धनाची शिकवण देणारा शिक्षक – योगेश सनेर यांचा प्रेरणादायी उपक्रम”

जळगांव  प्रतिनिधी-
“आपण किती वर्ष जगलात याला अर्थ नसून, कसे जगलात यालाच अर्थ असतो,” या विचारातून प्रेरणा घेत जि.प. उच्च प्राथमिक शाळा, मजरे हिंगोणे येथील उपक्रमशील शिक्षक श्री. योगेश जगन्नाथ सनेर यांनी विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणस्नेही दृष्टिकोन विकसित करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला आहे.
गटशिक्षणाधिकारी सौ. कविता सुर्वे मॅडम आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रेरणेने त्यांनी शाळा परिसरात वृक्षरोपणासोबत वृक्षसंवर्धनावर भर दिला. झाडांना जन्मदिवस साजरे करण्याचा नवा उपक्रम सुरू करून विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरणप्रेमाची खरी बीजं रुजवली.
आषाढी एकादशीच्या दिवशी, मागील वर्षी लावलेल्या ४० देशी झाडांचा पहिला वाढदिवस शाळेतील मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आनंदात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे या झाडांच्या संवर्धनासाठी त्यांनी स्वतः सुमारे २१,००० रुपये खर्च केला होता. रोप, संरक्षणजाळी, खडी-सिमेंट यांसह सर्व आवश्यक व्यवस्था त्यांनी स्वखर्चातून उभी केली.
या उपक्रमात शाळेस संरक्षण भिंत नसतानाही त्यांनी सहकाऱ्यांसोबत गुरांच्या मुक्त वावरास अडथळा न होता झाडे जगवली. मागील ५ वर्षांत माचला, देशमुख नगर आणि आता मजरे हिंगोणे येथील शाळांमध्ये १०० पेक्षा अधिक देशी झाडांची लागवड करून त्यांचे यशस्वी संवर्धन करण्याचा आदर्श सनेर सरांनी प्रस्थापित केला आहे.
यापूर्वीही माचला येथील शाळेला एच.डी.एफ. अर्गो विमा कंपनीकडून सोलर, ग्रंथालय, लॅब आणि नवीन इमारत मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
“शिक्षक समाज हा समाज परिवर्तनाचा खरा शिल्पकार आहे. पुढच्या पिढीच्या हितासाठी पर्यावरण आणि संस्कार दोन्हींचीच जपणूक गरजेची आहे,” असं मत श्री. सनेर यांनी व्यक्त केलं. त्यांनी यामागे सर्व सहकाऱ्यांचे, पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक आभार मानले.
एक शिक्षक म्हणून झाडांचा वाढदिवस साजरा करणाऱ्या श्री. योगेश सनेर यांचा पर्यावरणपूरक दृष्टिकोन समाजासाठी नक्कीच प्रेरणादायक ठरेल. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *