सार्वजनिक विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
1 min read

सार्वजनिक विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

Loading

सार्वजनिक विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

असोदा- सार्वजनिक विद्यालय असोदा येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्वीकारलेली विद्यार्थिनी वैष्णवी पाटील, मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल, प्रमुख अतिथी मंगला नारखेडे या सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. देवेश भोळे व हर्षल कोळी या विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य मनोगतातून व्यक्त केले. प्रमुख अतिथी मंगला नारखेडे यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक,शैक्षणिक कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा वारसा विद्यार्थ्यांनी पुढे चालू ठेवला पाहिजे असे वक्तव्य मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.जी.आर.महाजन, पी.जे.बऱ्हाटे,स्वाती वाघुळदे,कविता भोळे यांची कार्यक्रमास उपस्थित लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावना चौधरी तर आभार मोहिनी पाटील या विद्यार्थिनीने मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *