बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी भुसावळ येथे रविवारी निवड चाचणी.
1 min read

बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी भुसावळ येथे रविवारी निवड चाचणी.

Loading

बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी भुसावळ येथे रविवारी निवड चाचणी.

भुसावळ- १८वरिष्ठ राज्य बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्ह्यातील खेळाडूंसाठी निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन केले आहे. रविवारी (ता.१५) सकाळी ११ वाजता भुसावळ येथील पु.ओ. नाहाटा महाविद्यालय भुसावळ येथे निवड चाचणीचे आयोजन केले आहे.१८ वी वरिष्ठ राज्य पुरुष आणि महिला बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धा २० ते २२ दरम्यान अमरावती येथे करण्यात आले आहे. ही स्पर्धा संत गाडगे महाराज विद्यापीठात पार पडणार आहे. या स्पर्धेत जळगाव जिल्हा संघ सहभागी होण्यासाठी जिल्हा संघाची निवड करण्यासाठी दि. बेसबॉल असोसिएशन जळगांव जिल्हा निवड समितीने जिल्हा निवड चाचणीचे आयोजन केले आहे.तरी जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. प्रदीप साखरे यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पुरुष आणि महिला खेळाडूंनी चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. खेळाडूंनी स्वतःचे ग्लोव्हज, बॉल व इतर आवश्यक साहित्यासह वेळेवर उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी डॉ.प्रदीप साखरे (7020358118)मनोज वारके (942-318-9486 ), अजय देशमुख ( 098-904-46861 ) यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा बेसबॉल संघटनेच्या वतीने आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *