मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ठाणे पालघर जिल्ह्यात करू नका‌. ठाणे पालघर जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षक जाणार कुठे..?* – गुलाबराव पाटील *महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची शिक्षण मंत्र्यांशी भेट*
1 min read

मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ठाणे पालघर जिल्ह्यात करू नका‌. ठाणे पालघर जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षक जाणार कुठे..?* – गुलाबराव पाटील *महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची शिक्षण मंत्र्यांशी भेट*

Loading

*मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ठाणे पालघर जिल्ह्यात करू नका‌. ठाणे पालघर जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षक जाणार कुठे..?*
– गुलाबराव पाटील
*महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची शिक्षण मंत्र्यांशी भेट*

ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कोकण विभाग अध्यक्ष गुलाबराव पाटील व उपाध्यक्ष हेमलता मुनोत यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेत अतिरिक्त शिक्षकांच्या समस्यांवर चर्चा केली. मराठी माध्यमासह इतर माध्यमाच्या अनुदानित शाळा शासनाने नवीन संच मान्यतेचे धोरण ठरविल्यामुळे विद्यार्थी संख्या कमी होत असल्याने अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयामुळे तर अनेक शाळा बंद पडून हजारो शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत शासनाकडे पूर्वीप्रमाणे वर्गनिहाय शिक्षक किंवा 15 ते 20 पटसंख्या असलेला सुधारित शासन निर्णय काढा. असे संघटनात्मक शासन दरबारी निवेदने दिली आंदोलन केली. तरीही 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द करून नवीन आदेश काढला नाही. प्रत्येक जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षकांचे प्रमाण अधिक आहे ठाणे पालघर जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षक असतांनाच मुंबईतील अतिरिक्त शिक्षक पाठवू नये.2024/25 घ्या संच मान्यतेनुसार ठाणे जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षक आहेत शासन आदेशान्वये प्रथम आपापल्या मूळ जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होणे आवश्यक आहे तदनंतर इतर जिल्ह्यातील शिक्षकांचे समायोजन करणे हे धोरण आहे परंतु या धोरणचे पालन न करता शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून ठाणे जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षक असताना देखील इतर शिक्षकांना समायोजनाचे आदेश दिले जात आहेत सदर बाब योग्य नसल्याने तसेच ठाणे जिल्ह्यातील अनेक संस्थांनी मुंबईचे शिक्षक नाकारले आहेत.महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कोकण विभागाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील व उपाध्यक्ष हेमलता मुनोत यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना निवेदन देऊन सदर बाब लक्षात आणून दिली मंत्री भूसे यांनी निवेदनाची दखल घेत तातडीने पूर्तता करण्याचे आश्वासन दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *