कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या कार्याचे मूल्यमापन होणे गरजेचे… ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार हिंदू रत्न डॉ.रवींद्र भोळे
![]()
कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या कार्याचे मूल्यमापन होणे गरजेचे… ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार हिंदू रत्न डॉ.रवींद्र भोळे
पुणे: शासनाच्या विविध क्षेत्रात अनेक राजपत्रित अधिकारी, कनिष्ठ अधिकारी राष्ट्राच्या व समाजाच्या हितासाठी, भल्यासाठी ,समर्पित भावनेने विविध उपक्रम राबवत असतात. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असतात. शासकीय राजपत्रित अधिकारी व कनिष्ठ अधिकारी यांच्या कार्याचे मूल्यमापन होण्यासाठी पद्मश्री डॉ.मनीभाई देसाई प्रतिष्ठानच्या वतीने गेली 35 वर्षे पासून शासकीय कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करीत आहे.हक्क व कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्याचे मूल्यमापन व्हावे, यासाठी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या कार्याचे मूल्यमापन होणे गरजेचे आहे असे मत प्रवचनकार हिंदू रत्न डॉ. रवींद्र भोळे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ.मणी भाई देसाई प्रतिष्ठान उरुळी कांचन यांनी येथे प्रतिनिधी जवळ विचार व्यक्त केले. पद्मश्री डॉ मणी भाई देसाई प्रतिष्ठान युवक क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय, निती आयोग, एम एस एम इ उद्यम मंत्रालय भारत सरकार संलग्नित संस्थेच्या वतीने येथील पुणे ग्रामीणचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आयपीएस यांना पद्मश्री डॉ.मनीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह सन्मानपत्र शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी एडिटोरियल टीम प्रमुख ज्येष्ठ पत्रकार दैनिक राष्ट्रीय प्रसार चे प्रतिनिधी प्रल्हाद खर्चे, वरिष्ठ पत्रकार संदीप राजाराम शेलार, दैनिक केसरीचे पत्रकार अमोल भोसले, टेक्निकल एक्सपर्ट अँड एज्युकेटर डॉक्टर निनाद वायकोळे, प्रफुल्ल नारखेडे पाटील, अमोल पाटील अध्यक्ष मुक्ताई प्रतिष्ठान, अंकुश दळवी, प्रफुल्ल झोपे, नंदकुमार मुरकुटे, आदी मान्यवर उपस्थित होते.

