सामाजिक कार्यकर्ते सुनील इंगळे यांची पुरस्काराची हॅट्रिक
1 min read

सामाजिक कार्यकर्ते सुनील इंगळे यांची पुरस्काराची हॅट्रिक

Loading

सामाजिक कार्यकर्ते सुनील इंगळे यांची पुरस्काराची हॅट्रिक

गणेश हिरवे
मुंबई प्रतिनिधी

पुरस्कार प्रेरणा देतात आणि त्यातून राष्ट्र निर्मिती होते या दृष्टिकोनातूनच विविध मान्यवर व तळागाळात कार्य करणाऱ्या संस्था असतात. त्या निरपेक्ष वृत्तीने आपले समाजाभिमुख व लोकाभिमुख कार्य करीत असतात आणि त्यातूनच समाजातील तन-मन धनाने कार्य करणाऱ्या समाजसेवकांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांची उमेद वाढवण्यासाठी कार्यरत असतात अशाच काही राज्यस्तरीय संस्थांनी सुनील इंगळे यांचा यथोचित गौरव करण्यासाठी त्यांची निवड केली आहे याचे विशेष कौतुक म्हणजे या महिन्यात त्यांनी पुरस्काराची हॅट्रिक केली आहे मुंबई येथील ” जॉय ऑफ गिविंग ग्रुप ” ही नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली संस्था चे अध्यक्ष गणेश जी हिरवे यांनी “आदर्श समाजसेवक ” पुरस्कार जाहीर केला आहे तसेच प्रेरणा कुलकर्णी हे सामाजिक क्षेत्रात जे कार्य करतात की, जे आपल्या स्वप्नात सुद्धा नसेल,अशी सेवा लॉकडाऊन मध्येही त्याच्या अगोदरही व आज पावतो निस्वार्थ वृत्तीने कार्य करणाऱ्या ” प्रेरणा फाउंडेशन ” तर्फे ” समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्र गौरव पुरस्कार ” जाहीर केला आहे सोबतच खांन्देशात ” वैसुंधव कुटुंबकम ” हे ब्रीदवाक्य घेऊन कार्य करणाऱ्या ” समाज चिंतामणी प्रतिष्ठान ” जळगाव तर्फे ” समाज चिंतामणी ” या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे.अशा या कर्मयोगी व्यक्तिमत्त्वास आज पर्यंत 62 पेक्षा जास्त आणि 2 राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे समाजातील विविध स्थरातून स्वागत होत असून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *