उमेश महाजन यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
1 min read

उमेश महाजन यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

Loading

उमेश महाजन यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी – आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते तथा जय बाबाजी फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण उमेश महाजन यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 23 एप्रिल रोजी शिवाजीनगर पुणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह याठकाणी राजकीय आणि नाट्य क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे; अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष गणेश विटकर यांनी दिली आहे.

उमेश महाजन हे जळगाव जिल्यातील एरंडोल या गावचे मूळ रहिवासी असून ते सध्या नाशिक येथे वास्तव्यास आहेत. सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून गरीब आणि गरजू रुग्णांना आवश्यक ती वैद्यकीय मदत मिळवून देण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रम ते नेहमीच करत असतात. महाजन यांनी आता पर्यंत कॅन्सरग्रस्त, हार्ट अ‍ॅटॅक, पोटाच्या गाठी व किडनी आजाराशी संबंधित रुग्णांच्या अनेक शस्त्रक्रिया शासकीय योजनांच्या माध्यमातून मोफत घडवून आणल्या आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल युवा महाराष्ट्र फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने दखल घेत राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आहे.

उमेश महाजन यांच्या समाजसेवेची दखल घेऊन विविध संस्थांनी यांना यापूर्वी देखील गौरवीत केले आहे. वयाच्या 28 व्या वर्षी समाजरत्न पुरस्कार व 31 व्या वर्षात महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणारे उमेश महाजन हे एरंडोलमधील पहिलेच युवा आहेत. समाजात तरुणांसाठी त्यांनी नवा आदर्श घालून दिला असून महाजन यांना पुढील वाटचालीसाठी विविध क्षेत्रातून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *