स्व. दिलीप सावळे यांच्या अस्थींचे वृक्षराजीत विसर्जन, नातेवाईकांनी दिला पर्यावरणपूरक आदर्श!
1 min read

स्व. दिलीप सावळे यांच्या अस्थींचे वृक्षराजीत विसर्जन, नातेवाईकांनी दिला पर्यावरणपूरक आदर्श!

Loading

स्व. दिलीप सावळे यांच्या अस्थींचे वृक्षराजीत विसर्जन, नातेवाईकांनी दिला पर्यावरणपूरक आदर्श!

भुसावळ प्रतिनिधी
स्व. दिलीप सावळे यांच्या निधनानंतर, त्यांच्या नातेवाईकांनी एक अनोखा आणि पर्यावरणपूरक निर्णय घेतला, ज्यामुळे त्यांनी एक आदर्श उदाहरण निर्माण केले. त्यांनी त्यांच्या अस्थी जलाशयात विसर्जित करण्याऐवजी स्वतःच्या शेतामध्ये, वृक्षराजीच्या सहवासात विसर्जित केल्या.
या विशेष प्रसंगी बोहर्डी गावाचे सरपंच श्री बबलू सोनवणे, बाळू इंगळे, सागर वानखेडे आणि चंद्रकांत वाघ उपस्थित होते. स्व. दिलीप सावळे हे बोहर्डी बुद्रुक येथील माजी उपसरपंच व समाजसेवक म्हणून ओळखले जातात, ज्यांचे व्यक्तिमत्व सदैव इतरांना मदत करण्याच्या प्रयत्नात असायचे.
त्यांच्या स्वभावाच्या अनुशंगाने, नातेवाईकांनी जल प्रदूषण टाळण्याच्या उद्देशाने रूढ परंपरांचा स्वीकार न करता, अस्थी विसर्जित करण्याचा एक आदर्श निर्णय घेतला. विशेष म्हणजे, त्यांनी या ठिकाणी वृक्ष लागवडही केली, ज्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतरही ते इतरांना अस्तित्वात राहून मदत करीत राहतील.
परिवाराच्या या समर्पित निर्णयामुळे स्व. दिलीप सावळे यांच्या आत्म्याला खरी शांती लाभेल, हे निश्चित आहे. अशा प्रकारच्या आदर्श परंपरांची जोपासना करणे ही काळाची गरज बनली आहे, आणि या निर्णयामुळे परिसरातून त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे, जे समाजाला एक चांगला विचार देणारे ठरते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *