तिसऱ्या बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलनात मारवड महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा यशस्वी ठसा!
1 min read

तिसऱ्या बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलनात मारवड महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा यशस्वी ठसा!

Loading

तिसऱ्या बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलनात मारवड महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा यशस्वी ठसा!

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
मारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळाच्या कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी नुकत्याच प्रताप तत्वज्ञान केंद्र, अमळनेर येथे झालेल्या तिसऱ्या बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलनात दोन महत्त्वाची पारितोषिके मिळवली.
तृतीय वर्ष कला वर्गातील कु. नाजमीनबी पठाण हिने कथाकथन कला प्रकारात तृतीय स्थान प्राप्त केले. याशिवाय, प्रथम वर्ष कला वर्गातील कु. हर्षदा पाटील हिने बोलीभाषा- नाट्यछटा कला प्रकारात प्रथम क्रमांकाचे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. या यशामुळे महाविद्यालयाचा अभिमान अधिकच वाढला आहे.
यशाबद्दल संस्थाध्यक्ष मा. आबासो. जयवंतराव पाटील, उपाध्यक्ष मा. आबासो. देविदास साळुंखे, सचिव मा. आबाजी देविदास पाटील तसेच सर्व संचालक मंडळाने विद्यार्थिनींना कौतुकासह शुभेच्छा दिल्या आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले, उपप्राचार्य प्रा. डॉ. व्ही. डी. पाटील आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक-प्राध्यापकेत्तर कर्मचारी बंधूंनी या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
महाविद्यालयातील विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी यांनी सांगीतले की, या यशामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वर्धन झाला आहे आणि भविष्यात देखील असेच यश प्राप्त करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल.
अमळनेरच्या साहित्य क्षेत्रात विद्यार्थिनींच्या या यशाने एक नवा आदर्श निर्माण केला आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *