जागरूक मतदार लोकशाहीचा आधार – डायट प्राचार्य डॉ अनिल झोपे,  200 शिक्षण सेवकांनी केला मतदान जनजागृती करण्याचा संकल्प
1 min read

जागरूक मतदार लोकशाहीचा आधार – डायट प्राचार्य डॉ अनिल झोपे, 200 शिक्षण सेवकांनी केला मतदान जनजागृती करण्याचा संकल्प

Loading

जागरूक मतदार लोकशाहीचा आधार – डायट प्राचार्य डॉ अनिल झोपे,

200 शिक्षण सेवकांनी केला मतदान जनजागृती करण्याचा संकल्प

जळगाव प्रतिनिधी -जळगाव शहर विधानसभा मतदार संघ अंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी विनय गोसावी,तहसीलदार शीतल राजपूत,स्वीप नोडल अधिकारी सहाय्यक आयुक्त अश्विनी गायकवाड यांच्या नियोजनानुसार जळगाव शहरात मतदान जनजागृती करण्यात येत आहे. याअंतर्गत आज दि 10-11-24 रोजी गुळवे विद्यालय येथे सुमारे दोनशे शिक्षण सेवकांना मतदान जनजागृती करण्याबाबत प्रोत्साहित करण्यात आले. डायट प्राचार्य डॉ अनिल झोपे यांनी सांगितले की जागरूक मतदार हेच लोकशाहीचे आधार आहेत. मतदान टक्केवारीत वाढ करण्यासाठी शिक्षण सेवकांनी आपल्या कार्यक्षेत्रात विविध उपक्रम घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. सर्वांनी मतदान करण्याची शपथ घेतली.याप्रसंगी अधिव्याख्याता डॉ सी डी साळुंखे, डॉ दरंदले, प्रा गणेश सूर्यवंशी, प्रा अतुल इंगळे, डी एड प्राचार्या महाजन मॅडम, विषय तज्ञ नरेंद्र कांबळे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीते साठी शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, मनपा अभियंता प्रकाश पाटील, गायत्री महाले, सुयश सोनटक्के यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *