कास्टाईब कर्मचारी महासंघ जळगाव सभा संपन्न, बहुजन कर्मचाऱ्यांचे संघटन पुढच्या पिढीचा आधार-अनिल सुरडकर
1 min read

कास्टाईब कर्मचारी महासंघ जळगाव सभा संपन्न, बहुजन कर्मचाऱ्यांचे संघटन पुढच्या पिढीचा आधार-अनिल सुरडकर

Loading

कास्टाईब कर्मचारी महासंघ जळगाव सभा संपन्न

बहुजन कर्मचाऱ्यांचे संघटन पुढच्या पिढीचा आधार –
अनिल सुरडकर

जळगाव प्रतिनिधी

नोकरीतील होत जाणार खाजगीकरण त्यासोबतच संविधानाने दिलेले अधिकार हक्क यासंदर्भात जागरूकता नसल्याने कर्मचाऱ्यांवर होणारे अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढत जात असल्याने कर्मचाऱ्यांचे संघटन आवश्यक असून कर्मचाऱ्यांच्या संघटना मजबूत झाल्यास त्या पुढच्या पिढीचा आधार होऊ शकतात असे मत कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल सुरडकर यांनी सहविचार सभेप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलताना व्यक्त केले.
याप्रसंगी डॉ. मिलिंद बागुल यांनी कर्मचाऱ्याला संघटना ही संरक्षण कवच असते आणि संघटने शिवाय आपल्या आपल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षितता देखील जाणवत असते यासाठी असणाऱ्या कायद्याची जाणीव आणि त्या सोबतच आपल्या कर्तव्याची परिपूर्ती करणे सुद्धा आवश्यक असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी मांडले
प्रा. डॉ.सत्यजित साळवे यांनी सहविचार सभेचे प्रास्ताविक केले.
माजी शिक्षण विस्तार अधिकारी सुमित्र अहिरे,निलेश पालवे, संजय ठाकूर, सलीम तडवी, जिल्हा परिषद कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष रवींद्र सोनवणे, जावेद जमादार,प्रताप बोदडे, डी.एम.भालेराव यांनी बैठकीला संबोधित केले.
राजेंद्र सोनवणे,आर एस लोखंडे, सुमेध जाधव, किरण लाडवंजारी, प्रशांत सोनवणे, राहुल नवगिरे, जितेंद्र जावळे, बाबूलाल शिरसाट रवींद्र दोंदे, प्रीतम शिरतुरे, अजित चव्हाण, योगेश तायडे, प्रमोद काळे, चंद्रकांत हातगडे, प्रमोद अहिरे, जगन्नाथ नन्नवरे,संजय ठाकूर, डॉ. जितेंद्र साळुंखे,संजय निकम चंद्रमणी निकम,शरद बोदडे, विकास बिऱ्हाडे,आनंद पगारे,आर एम कांबळे ,यांनी चर्चेत सहभाग घेऊन कर्मचाऱ्यांच्या अडचणी संदर्भात मांडणी केली. बैठकीचे सूत्रसंचालन सुनील सोनवणे यांनी तर आभार रवींद्र सोनवणे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *