राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघाने अजिंक्यपद पटकावले
1 min read

राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघाने अजिंक्यपद पटकावले

Loading

राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघाने अजिंक्यपद पटकावले

ठाणे:कल्याण:(मनीलाल शिंपी) दिनांक १२ ते १४ सप्टेंबर दरम्यान २१ वी सब-ज्युनियर, ज्युनियर व सिनीयर जम्परोप राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा क्रीडा संकुल यशवंत महाविद्यालय, नांदेड या ठिकाणी संपन्न झाली. सदर राष्ट्रीय स्पर्धेत पंजाब, जम्मू कश्मीर, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, यु.पी., दिल्ली अशा विविध राज्यातून जवळपास 300 पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदविला. जम्परोप स्पर्धेत महाराष्ट्र राज्याला घवघवीत यश मिळाले व अजिंक्यपद देखील मिळाले.
राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेचा उद्घाटन सोहळा दिनांक १२ सप्टेंबर रोजी संपन्न झाला. उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नरेंद्र चव्हाण, राष्ट्रीय संपरोप संघटनेचे महासचिव साजाद खान, ऑलिंपिक निरीक्षक अशोक दुधारे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जनार्दन गुपिले जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंबरे तसेच महाराष्ट्र राज्य जम्परोप असोसिएशने सचिव दिपक निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
या राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील मुले व मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ठाणे जिल्ह्यातील मुले व मुली यांनी ११ सुवर्ण पदके, ११ रौप्य पदके, २ कान्स्य पदके असे एकूण २४ पदके पटकावली. ठाणे जिल्ह्यातील मुले व मुली यांचे सराव शिबीर ठाणे जिल्हा जम्परोप असोसिएशनच्या कार्यवाह लता पाचपोर मॅडम व इंडीया कोच अमन वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. महाराष्ट्राच्या यशात ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी केली त्याबद्दल कार्यवाह लता पाचपोर व प्रशिक्षक अमन वर्मा यांचे खूप कौतुक करण्यात आले.
भुमिका नेमाडे, पद्माक्क्षी मोकाशी, दक्षिता देकाटे, योगीता सामंत, भाग्यश्री पाटील, पारोल झनकार, तन्वी नेमाडे, अनिश अयंकर, हर्षित शहा, विहंत मोरे, ईशान पुथरन हे खेळाडू सुवर्णपदकाचे मानकरी ठरले.
काजल जाधव, वंश हिरोडे, वेदांत सरकटे, अवनी पांडे, नैवद्या सिंग, ख्याती यादव, या खेळाडूंना रौप्यपदकाने सन्मानित करण्यात आले अनन्या यादव, रूद्र भगत, सुक्रुता बेंडाळे, अयंश रोठे, रोनक साळवे
कान्स्य पदक – अयान यादव, पुर्वा शिरसाठ यांनी कास्य पदक पटकावले. विजय संघाचे व पारितोषिक प्राप्त सर्व खेळाडूंचे कल्याण तालुका शारीरिक शिक्षण मंडळ व सर्व क्रीडा संघटक प्रशिक्षक, क्रीडा संघटना असोसिएशन यांच्यातर्फे अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *