कोल्हापूरमध्ये पोलिसांची वार्तांकन करणाऱ्यां पत्रकारांना धक्काबुक्की  राज्यात काय चाललयं हे ! पत्रकार दडपशाही खपवून घेणार नाहीत  पत्रकार संघटना लवकरच ठोस निर्णय घेतील, एस एम देशमुख यांचा इशारा
1 min read

कोल्हापूरमध्ये पोलिसांची वार्तांकन करणाऱ्यां पत्रकारांना धक्काबुक्की राज्यात काय चाललयं हे ! पत्रकार दडपशाही खपवून घेणार नाहीत पत्रकार संघटना लवकरच ठोस निर्णय घेतील, एस एम देशमुख यांचा इशारा

Loading

कोल्हापूरमध्ये पोलिसांची वार्तांकन करणाऱ्यां पत्रकारांना धक्काबुक्की

राज्यात काय चाललयं हे ! पत्रकार दडपशाही खपवून घेणार नाहीत

पत्रकार संघटना लवकरच ठोस निर्णय घेतील, एस एम देशमुख यांचा इशारा

मुंबई – बदलापूर येथील पत्रकार मोहिनी जाधव या वार्तांकन करीत असतांना त्यांच्याशी स्थानिक पुढाऱ्याने केलेल्या आक्षेपार्ह वर्तनाने महाराष्ट्राच्या माध्यम क्षेत्रात संतापाचे वातावरण असतांनाच काल कोल्हापूर मध्येही पोलिसांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली , रायगडात पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारांचा आवाज बंद करणे मुद्याम सुरू आहे , काय चाललयं हे ?ही दडपशाही पत्रकार खपवून घेणार नाहीत असा इशारा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी राज्यकर्त्यांना दिला असून याबाबत पत्रकार संघटना लवकरच ठोस भूमिका घेतील असे स्पष्ट केले.

या घटनेसंदर्भात एस एम देशमुख यांनी आपल्या निषेध पत्रकात पुढे म्हटले आहे की,गुंडगिरीच्या माध्यमातून, कायद्याचा धाक दाखवून किंवा पोलिसांच्या हातून राज्यातील पत्रकारांचा आवाज बंद करण्यातचा प्रयत्न महाराष्ट्रात सातत्यानं होताना दिसतो आहे.. बदलापूर येथील पत्रकार मोहिनी जाधव यांच्याशी बोलताना वामन म्हात्रे या शिंदे गटाच्या नेत्याने वापरलेली अश्लील, असभ्य भाषेमुळे महाराष्ट्रातील माध्यम क्षेत्रात संतापाचे वातावरण असतानाच आज कोल्हापूरमध्येही पत्रकारांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे.. ऑलिम्पिक कास्य पदक विजेता स्वप्निल कुसळेची भव्य स्वागत रॅली काढण्यात आली होती.. या रँलीचे वार्तांकन करणारया पत्रकार आणि कॅमेरामनला पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि अन्य अधिकाऱ्यांनी धक्काबुक्की केली.. पत्रकारांनी याची तक्रार लगेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.. त्यावर फडणवीस यांनी माफी मागितली असली तरी संबंधित पोलीस अधिकारयांवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.. आणखी एक घटना रायगडमधून समोर आली आहे.. जगाला माहिती आहे की, मुंबई – गोवा महामार्ग सतरा वर्षे रखडला आहे.. त्यासाठी पत्रकारांचा लढा सुरू आहे.. कोणामुळे रखडला हा महामार्ग? खासदार म्हणून महामार्ग रखडला याची जबाबदारी खा. सुनील तटकरे यांची आहे.. रायगडच्या पत्रकारांनी समाज माध्यमातून तटकरेंना थेट यासंदर्भात जाब विचारला.. झालं, ते खासदार महोदयांना आवडलं नाही.. आपली बदनामी झाल्याचं सांगत ते संतापले, आणि आपल्या कार्यकर्त्यांना सांगून रोहयाचे पत्रकार राजेंद्र जाधव यांच्या विरोधात पोलिसात तक्रारी दिल्या गेल्या.. पत्रकारांवर गुन्हे दाखल करून मुंबई – गोवा महामार्गाचा विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न सुनील तटकरे करीत आहेत.. सुनील तटकरे हे सत्ताधारी पक्षाचे खासदार असल्याने सत्तेचा वापर करून ते पत्रकारांचा आवाज बंद करू पाहात आहेत.. या प्रकाराचा रायगडच्या पत्रकारांनी एकत्र येत निषेध केला.. पोलिसांनी आज पत्रकारांना चौकशीसाठी बोलावले होते.. पत्रकारांवर गुन्हे दाखल झाले तर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे नियोजित अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी दिला आहे.. राज्यात पत्रकार संरक्षण कायदा आहे पण त्याचे नोटिफिकेशन सरकार हेतूत:काढत नाहीत, पत्रकार कायम दहशतीखाली राहिले पाहिजेत असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असलयानं वामन म्हात्रेवर ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचे गंभीर गुन्हे दाखल असूनही पोलीस त्यांना अटक करीत नाहीत.. यासंदर्भात चर्चा करून पत्रकार संघटना लवकरच ठोस भूमिका घेतील असे एस.एम.देशमुख यांनी स्पष्ट केले आहे..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *