श्री गाडगे महाराज धर्मशाळा भायखळा येथे श्री गाडगे महाराज यांची १५० वी जयंती जल्लोषात…. स्वच्छतेवर भर देणार-महापौर रितू तावडे
![]()
श्री गाडगे महाराज धर्मशाळा भायखळा येथे श्री गाडगे महाराज यांची १५० वी जयंती जल्लोषात…. स्वच्छतेवर भर देणार-महापौर रितू तावडे
मुंबई प्रतिनिधी
श्री संत गाडगे महाराज 150 व्या जयंतीनिमित्त श्री गाडगेबाबा धर्मशाळा, भायखळा येथे जयंती उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
यंदाचे वर्ष श्री संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे 150 वे वर्षी असल्यामुळे बाबांच्या जयंती निमित्त शासनाकडून सर्व जिल्ह्यांमध्ये बाबांची जयंती महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे, विदर्भ समाज संघ व विदर्भ वैभव मंदिर आणि गाडगे महाराज धर्मशाळा भायखळा यांच्या संयुक्त विद्यमानाने यावर्षी सुद्धा श्री गाडगेबाबा धर्मशाळा, भायखळा येथे बाबांचा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला, या कार्यक्रमाला मुंबईचे महापौर रितू तावडे व विदर्भ समाज संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम भुयार विदर्भ वैभव मंदिर चे अध्यक्ष अशोकराव बारब्दे ,कार्यकारी विश्वस्त गजानन नागे सरचिटणीस, उत्तमराव लोणाकर निमंत्रक प्रभाकर आडेकर तसेच या कार्यक्रमाला कामा हॉस्पिटलच्या डिन डॉ राजश्री कटके उपस्थित होत्या.
बाबांच्या जयंतीनिमित्त महापौर रितू ताई तावडे यांनी बाबाच्या प्रतिमेला हार घालून पूजन केले त्यानंतर गाडगेबाबांच्या जीवनावर एकांकिका नाटक या ठिकाणी सादर करण्यात आले, या ठिकाणी उपस्थित असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना ब्लॅंकेट वाटप व महाप्रसाद वाटप या ठिकाणी करण्यात आला. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते गाडगे महाराज धर्म शाळेचे विश्वस्त एकनाथ भाऊ ठाकूर व व्यवस्थापक अमोल ठाकूर यांनी या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. श्री संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम मुंबईमध्ये केले जाणार आहेत. असे संस्थेचे सरचिटणीस गजानन नागे यांनी आपल्या भाषणातून सांगितले. तसेच श्री संत गाडगे महाराज यांचे शेवटचे भाषण वांद्रे पोलीस स्टेशन पश्चिम या ठिकाणी झाले होते. त्या ठिकाणी बाबांचे भव्य स्मारक मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात यावं. तसेच श्री गाडगेबाबा स्वच्छता अभियान हे पूर्वीचे हे नाव महाराष्ट्र सरकारने, मुंबई महानगरपालिकेने दिले होते सदर नाव पुन्हा देण्यात यावे अशी महापौरांना विनंती केली. श्री संत गाडगे महाराज यांना भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न सरकारने जाहीर करावा अशी विनंती गजानन नागे यांनी केली , गाडगेबाबाच्या जन्मगाव येथे बाबांचा भव्य दिव्य स्मारक उभारण्याचा मनोदय विदर्भ समाज संघाचे गजानन नागे व विदर्भ वैभव मंदिर चे अध्यक्ष श्री अशोकराव बारब्दे यांनी आपल्या भाषणातून केला.
गाडगे बाबाच्या संदेशाप्रमाणे मुंबई महापालिकेत काम केल्या जाईल स्वच्छतेवर भर दिला जाईल, रुग्णालयात गोरगरिबांना आणि शिक्षणासाठी कशी मदत करण्यावर भर दिला जाईल. गाडगेबाबांच्या नावे अनेक उपक्रम मुंबई महापालिकेत राबवण्याचा मनोदय महापौरांनी या वेळी व्यक्त केला. आपल्या गाडगेबाबांच्या या 150 वर्षानिमित्त गाडगेबाबांच्या विचाराचा प्रचार प्रसार करण्याचा मनोदय महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा भायखळा व विदर्भ समाज संघ मुंबई व विदर्भ मंदिर मुंबई या संस्थेच्या वतीने सहकार्य व मेहनत करण्यात आली त्यानंतर गाडगेबाबांची प्रार्थना व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

