समाधान माळी ‘ कला समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित !….  पुरस्काराने ऊर्जा मिळते : समाधान माळी ( कलाकार )
1 min read

समाधान माळी ‘ कला समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित !…. पुरस्काराने ऊर्जा मिळते : समाधान माळी ( कलाकार )

Loading

समाधान माळी ‘ कला समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित !….

पुरस्काराने ऊर्जा मिळते : समाधान माळी ( कलाकार )

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूलचे माजी विद्यार्थी व मनसे शहर उपाध्यक्ष तथा चित्रपट सेनेचे तालुका अध्यक्ष समाधान सुरेश माळी यांना नुकतेच पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात ‘कला समाज भूषण 2025’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
समाधान माळी यांनी विविध मराठी व अहिराणी चित्रपटात काम केले असून दिग्दर्शक म्हणुन देखील काम केले आहे. यांच्या या कार्याची दखल घेत राम नवमी निमित्त झालेल्या ‘स्वराज्य फिल्म प्रोडक्शन व जीवाजी महाले फाउंडेशन आयोजित कार्यक्रमात गिरी एस राज तसेच ओबीसी नेते लक्ष्मण हाके, जेष्ठ सीने अभिनेता सुनील नाना गोडबोले यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
याप्रसंगी आगामी चित्रपट ‘वैराट’ चे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. वैराट या चित्रपटाचे दिग्दर्शन गिरी एस राज, स्वराज्य फिल्म प्रोडक्शन यांनी केले आहे. याच कार्यक्रमात समाधान माळी यांना अवार्ड देवून सन्मानित करण्यात आले. समाधान माळी यांचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *