स्त्री शक्तीचा सन्मान: अमळनेरच्या साने गुरुजी  माध्यमिक पतसंस्थेत नवीन नियुक्त्या   खजिनदारपदी प्रा मंदाकिनी भामरे तर मानदसचिव पदी सविता अहिरे मॅडम यांची वर्णी
1 min read

स्त्री शक्तीचा सन्मान: अमळनेरच्या साने गुरुजी माध्यमिक पतसंस्थेत नवीन नियुक्त्या खजिनदारपदी प्रा मंदाकिनी भामरे तर मानदसचिव पदी सविता अहिरे मॅडम यांची वर्णी

Loading

स्त्री शक्तीचा सन्मान: अमळनेरच्या साने गुरुजी माध्यमिक पतसंस्थेत नवीन नियुक्त्या

खजिनदारपदी प्रा मंदाकिनी भामरे तर मानदसचिव पदी सविता अहिरे मॅडम यांची वर्णी

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी माध्यमिक शिक्षक व इतर नोकरवर्गाच्या सहकारी पतसंस्थेची नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, ज्यामध्ये खजिनदारपदी प्रा. श्रीमती मंदाकिनी नवल भामरे यांची व मानद सचिव म्हणून सविता अहिरे मॅडम यांची निवड करण्यात आली.
या विशेष बैठकीत साने गुरुजी शिक्षक पतपेढीच्या अध्यक्ष आणि संचालक मंडळांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत स्त्री शक्तीचा गौरव केला. प्रा.श्रीमती मंदाकिनी पाटील आणि सविता अहिरे यांची नियुक्ती ही महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेतील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
या प्रसंगी, सर्व सन्माननीय महिला सभासद भगिनींना जागतिक महिला दिनाच्या मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी उपस्थित माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक तुषार बोरसे, सानेगुरुजी शिक्षक पतपढीचे अध्यक्ष सुशील भदाने, उपाध्यक्ष महेश नेरपगारे, संचालक संजीव पाटील, तज्ञ संचालक संजय पाटील, मुख्याध्यापक आर.बी. पाटील, जे.डी. अहिरे आणि साने गुरुजी शिक्षक पतपेढीचे सर्व कर्मचारी वृंद.
या नवीन नियुक्त्यांनी संस्थेत महिलांच्या नेतृत्वाच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला आहे. महिलांच्या अद्वितीय क्षमतांचा सन्मान करण्याच्या या उपक्रमाने पतसंस्थेतील वातावरण आणखी समृद्ध केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *