महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाची विविध विषयांवर कल्याण येथे सभेचे आयोजन. * *महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचा सभेचा अध्यक्षस्थानी राज्यअध्यक्ष श्री. शरदचंद्र धारुरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे .*
1 min read

महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाची विविध विषयांवर कल्याण येथे सभेचे आयोजन. * *महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचा सभेचा अध्यक्षस्थानी राज्यअध्यक्ष श्री. शरदचंद्र धारुरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे .*

Loading

*महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाची विविध विषयांवर कल्याण येथे सभेचे आयोजन.
*
*महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचा सभेचा अध्यक्षस्थानी राज्यअध्यक्ष श्री. शरदचंद्र धारुरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे .*

ठाणे : कल्याण( मनिलाल शिंपी)महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, मुंबई विभाग व
ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुके (ग्रामीण) व महानगरपालिका क्षेत्रातील (शहरी), सर्व माध्यमांच्या, अनुदानित, विनाअनुदानित व स्वयं अर्थसंचालित माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शैक्षणिक अर्हता B.P.Ed, M.P.Ed तसेच क्रीडा विषयातील P.hd धारण केलेल्या क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक / शिक्षीका महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या मुंबई विभागाच्या माध्यमातून, राज्य अध्यक्ष सन्मा. श्री. शरदचंद्र धारुरकर यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्ह्यातील सर्व क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षकांची , रविवार दि. 9 मार्च 2025 रोजी दुपारी 12:30 वाजता सन्मा. श्री. आप्पासाहेब शिंदे यांचे कार्यालय, पहिला मजला, त्रिपाठी हॉटेलच्यावर, गुरुदेव हॉटेल समोर, स्टेशन रोड, कल्याण पश्चिम (स्व. मोते सरांचे शिक्षक परिषदेचे जुने कार्यालयाची इमारत) जिल्हा मिटिंगचे आयोजन करण्यात आले आहे.*
*👉टीप – मिटिंग वेळेवरच सुरु होणार आहे, याची नोंद घ्यावी.*
*सभेपुढील विषय*
*1) प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय*
*2) महासंघाच्या कार्याची ओळख*
*3) ग्रेस गुण ऑनलाईन फॉर्म वरील चर्चा*
*4) ठाणे जिल्हा कार्यकारिणी निवड*
*5) राज्य अध्यक्षांचे मौलिक विचार*
*6) प्रश्नोत्तरे व शंका निरसन*
*7) आभार प्रदर्शन*
*मिटिंग नियोजित वेळेत पूर्ण होण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यानुसार सर्वांनी सहकार्य करावे.
*1) सर्वांनी वेळेपूर्वी उपस्थित रहावे.*
*2) दिलेल्या विषयानुसार सभा सुरु असताना प्रश्न विचारुन व्यत्यय आणू नये.*
*3) मिटिंग मुद्दा क्र. 3 – “ग्रेस गुणाच्या बाबतीत” राज्य अध्यक्षांनी, राज्य संघटनेच्या माध्यमातून केलेल्या कामाचा आढावा शांततेत सर्वांनी ऐकावा! आपली शंका “प्रश्नोत्तरे व शंका निरसन” यावेळी विचारावेत. बाकी आपण सर्व सूज्ञ क्रीडा शिक्षक आहात त्यामुळे शिस्तीचे पालन आवश्यक आहे.*
*4) अन्य शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनांचे विषय चर्चेला घेऊन कोणीही विषयांतर करु नये.*
*5) सर्व महानगरपालिका क्षेत्रातील तसेच ठाणे ग्रामीण क्षेत्रातील क्रीडा शिक्षकांनी आपापल्या क्षेत्रातील संघटनेची स्वतंत्र रचना तयार करुनच मिटिंगला यावे. जेणेकरुन आपला वेळ वाया जाणार नाही.*
*विभागवार रचना -*
*अध्यक्ष -1*
*कार्याध्यक्ष -1*
*उपाध्यक्ष -1/2/3*
*सचिव -1*
*सहसचिव -1/2/3*
*खजिनदार -1*
*संघटक -1*
*सदस्य – आवश्यकतेनुसार*
*याप्रमाणे आपल्या विभागाची रचना – 7/9/11/13/15…. याप्रमाणे विषम संख्या असावी.*
*मिटिंग मुद्दा क्र. 6 नुसार “प्रश्नोत्तरे व शंका निरसन” या विषया बाबतचे प्रश्न मिटिंग सुरु होण्यापूर्वीच आपल्या विभागाचे किंवा वैयक्तिक प्रश्न माझ्याकडे लेखी स्वरुपात (श्री. अंकुर आहेर सर) जमा करावेत. कोणालाही आयत्यावेळी प्रश्न विचारता येणार नाहीत, याची नोंद घ्यावी.*

मिटिंगच्या दरम्यान पिण्याच्या पाण्याची, चहा व नाश्ता यांची सोय केलेली आहे.*
सर्वांनी वेळावर उपस्थित राहावे असे आवाहन
महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, मुंबई विभाग सचिव शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्री.अंकुर भिकाजी आहेर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *